वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : अमेरिकेत नागरिकांनी चक्क विमान आणि रेल्वेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. तर नागरिकांचा कल आता कमी भाड्याच्या आरामदायी प्रवासाकडे वाढू लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता बहुतांश लक्झरी कोचकडे अमेरिकन नागरिकांचा कल दिसून येत आहे.
अमेरिकेत स्टार्टअप कंपन्या लक्झरी बसला आता लक्झरी कोच असे संबोधू लागल्या आहेत. नागरिकांना या कोचमधून प्रवास करणे आवडू लागले आहे. त्यामुळे सामान्य अमेरिकन नागरिकांनी विमानसेवा आणि रेल्वेकडे जणू पाठ फिरवल्याचे दिसते. कारण विमान आणि रेल्वेपेक्षाही या सेवेचे भाडे कमी आहे. त्याशिवाय ही सेवा अत्यंत आरामदायी आहे. वास्तविक अनेक दशके स्लीपर बस अमेरिकेसह युरोपातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी होती. २०१७ मध्ये केबिन, खासगी पॉड्समध्ये टकबेडसह डबल डेकर बस रात्रीच्या प्रवासासाठी सुरू झाल्या होत्या.
लॉस एंजलिस ते सॅन फ्रान्सिस्को दरम्यान ही सेवा होती. परंतु २०२० मध्ये कोविड आल्यानंतर सेवा बंद पडली होती. परंतु अमेरिकेत पुन्हा ही सेवा सुरू झाली. ही सेवा लोकांच्या पसंतीस उतरली आहे. हायटेक सुविधांसह याद्वारे लहान प्रवास करता येतो. रेड कोच, वोनलेन, जेट अशा १४ आसनी बस प्रवाशांना मेट्रो सेंटर ते मॅनहटन येथे हडसन यार्डपर्यंत घेऊन जातात. या बसमध्ये अतिशय आरामदायी आसने आहेत. हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
या सेवेमुळे वॉशिंग्टन ते नॅशव्हिलेचे अंतर दोन तासांत पूर्ण करता येते. काही प्रवाशांना हे अंतर पूर्ण करण्यासाठी १० ते ११ तास लागत असल्याचे कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन एरोनोव यांनी सांगितले.