बदलापूर : दिवाळीचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना बदलापूर जवळच्या कोंडेश्वरमध्ये घाटकोपर येथील चार अल्पवयीन मुले बुडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील कोंडेश्वर मंदिराच्या मागे धबधब्याच्या कुंडात चारही मुले बुडाल्याचा प्रकार समोर आला. या चारही जणाचा मृत्यू झाला आहे. हे चौघेही घाटकोपरहून पिकनिकसाठी कोंडेश्वरला आल्याची माहिती समोर आली आहे.