राऊतांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबरला सुनावणी
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. यामुळे राऊतांचा कारागृहातील मुक्काम १३ दिवसांनी वाढला आहे. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केलेले संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत.
कथित शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणात गेल्या वर्षीच्या २ नोव्हेंबरपासून अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काही दिवसांपूर्वीच ‘ईडी’च्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला होता. मात्र, याच प्रकरणात त्यांच्यावर सीबीआयनेही गुन्हा दाखल केला असल्याने त्यांना तुरुंगात राहावे लागत आहे. आज सीबीआय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांचीही दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.
“देशमुख यांच्यावरील गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. देशमुख यांना कारागृहात योग्य ते वैद्यकीय उपचार मिळत आहेत. शिवाय प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचा जबाब महत्त्वाचा आहे”, असे विशेष सीबीआय न्यायालयाने देशमुख यांना जामीन नाकारताना नमूद केले.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…