Friday, May 9, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

रुपाली गंगावणेची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 'सुवर्ण कामगिरी'

रुपाली गंगावणेची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 'सुवर्ण कामगिरी'

मुंबई (वार्ताहर) : लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य क्रीडा केंद्रात सराव करणारी रुपाली सुनील गंगावणे हिने गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांब या क्रीडा प्रकारात ३ सुवर्ण १ कांस्य पदक पटकावत महाराष्ट्रासाठी सुवर्ण कामगिरी केली.


तिचे प्रशिक्षक असलेले तिचे वडील सुनील गंगावणे यांनी आपले अपुरे स्वप्न मुलीच्या रुपात पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त महेंद्र चेंबूरकर व किसन कदम यांचे मार्गदर्शन लाभले.


संस्थेचे सचिव माणिक पाटील व विश्वस्त सुबोध आचार्य यांनी रुपाली व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment