Monday, October 27, 2025
Happy Diwali

मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झाले आहेत. काँग्रेस पक्षाला तब्बल २४ वर्षांनंतर नवा अध्यक्ष मिळाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरूर यांचा जवळपास ७ हजार मतांनी पराभव केला. खरगे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली. तर शशी थरूर यांना केवळ १ हजार ७२ मते मिळवता आली. ४१६ मते नाकारण्यात आली.

मात्र, मतमोजणी सुरू असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार हे सांगितले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान आंध्रमधील पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले होते की आता माझी भूमिकाही खरगेजीच ठरवतील.

पत्रकार परिषदेत राहुल यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेतल्याबद्दल काँग्रेसचा अभिमान व्यक्त केला आहे. येथे काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी दावा केला की, खरगे यांना ९५०० मतांपैकी ७८९७ मते मिळाली. त्याचवेळी थरूर यांना केवळ १०७२ मते मिळवता आली.

Comments
Add Comment