Saturday, August 30, 2025

रुपयाचे विक्रमी अवमूल्यन! डॉलरच्या तुलनेत पोहोचला ८३ रुपयांवर

रुपयाचे विक्रमी अवमूल्यन! डॉलरच्या तुलनेत पोहोचला ८३ रुपयांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य बुधवारी ७१ पैशांनी घसरले, त्यामुळे रुपयाचे विक्रमी अवमूल्यन होऊन तो ८३ रुपयांवर पोहोचला. यामुळे घराघरातील बजेटवर मोठा परिणाम होणार आहे.

युकेमध्ये महागाई वाढल्याने डॉलर जगभरातील विविध देशांतील चलनांच्या तुलनेत मजबूत झाला. सप्टेंबरमध्ये ४० वर्षातील ही सर्वांत मोठी पडझड आहे.

देशाचा ग्राहक किंमत निर्देशांक १०.१ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो गेल्या महिन्यात ९.९ टक्क्यांवर होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली होती. महागाईचा हा नवा डेटा जुलैमधील उच्चांकावर पोहोचल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे सन १९८२ नंतर महागाई सध्या सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे. महागाई वाढल्याने खाद्य पदार्थांच्या किमतीमध्ये वर्षभरात १४.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १९८० नंतरची महागाईची ही उच्च झेप असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे. बुधवारी ही माहिती देण्यात आली. महागाईचा हा नवा डेटा जुलैमधील उच्चांकावर पोहोचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १९८२ नंतर महागाई सध्या सर्वोच्च स्थानी पाहोचली आहे.

Comments
Add Comment