औरंगाबाद/मुंबई : औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना काल दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना आज सकाळी तातडीने एअर अॅम्बुलन्सने मुंबईतील लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
संजय शिरसाठ यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांनी सांगितले की, संजय शिरसाट यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे
संजय शिरसाट यांच्या छातीत कालपासून दुखत होते. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून ते अगोदरच निघून गेले होते. त्यानंतर काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांची लिलावतीमध्ये भेट घेणार आहेत.
दरम्यान, शिरसाट यांच्यावर काल रात्री उपचार करण्यात आल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणादेखील झाली. अँजिओग्राफीनंतर संजय शिरसाट यांनी मुंबईत उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आज सकाळी एअर अॅम्बुलन्सने त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले. संजय शिरसाट यांची तब्येत आता बरी आहे. केवळ काळजी म्हणून त्यांना मुंबईला हलवण्यात आले, अशी माहिती सिग्मा हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…