मुंबई : राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये रविवारी १०७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या वेळी सरपंचाची निवड थेट जनतेतून झाली. भाजपने ३९७, शिंदेसेना ८१, राष्ट्रवादी ९८, शिवसेना ठाकरे पक्ष ८७, काँग्रेसने १०४ जागा जिंकल्याचा दावा केला. तर अपक्षांच्या ताब्यात तब्बल ३१२ ग्रामपंचायती गेल्या आहेत.
राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरेसेना आणि शिंदेसेना यांच्यात जास्त फरक नाही. शिवसेनेमधील ठाकरे सेनेच्या ताब्यात ८७ ग्रामपंचायती आहेत. तर शिंदें सेनेच्या ताब्यात ८१ ग्रामपंचायती आल्या आहेत. दोन्ही गटांमध्ये ६ ग्रामपंचायतींचा फरक आहे. हा फरक मोठा मानला जात नाही. याचा आगामी काळात काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.