मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज राऊत यांना पुन्हा एकदा पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी झाली.