Monday, January 13, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेकेडीएमसी महापालिकेत 'दिवाळी गिफ्टला' मनाई!

केडीएमसी महापालिकेत ‘दिवाळी गिफ्टला’ मनाई!

कल्याण (प्रतिनिधी) : दिवाळी तोंडावर आली की पालिकेतील अधिकारी, त्यांच्या हाताखालील कर्मचारी यांना शहरातील बड्या व्यक्ती, संस्थांकडून दिवाळी गिफ्ट देऊन खूश केले जाते. आपली कामे लवकर व्हावी यासाठी गिफ्ट देऊन खूष ठेवले जाते. दिवाळी तर हक्काने या वस्तू उघड उघड दिल्या जातात. परंतू आता या दिवाळी गिफ्ट ला केडीएमसी पालिकेत मनाई करण्यात आली आहे.

अधिकारी, कर्मचारी यांनी कोणाकडूनही दिवाळी गिफ्ट स्वतः घेऊ नये. तसेच इतर व्यक्तींमार्फत हे गिफ्ट येत असेल तरी ते घेण्यात येऊ नये. असेही नको आणि तसेही गिफ्ट नको अन्यथा शिस्तभंगाची कारवाई संबंधितांवर केली जाईल असा फतवा केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी काढला आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारी यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱी यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, असे पत्रक आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय प्रशासनाने घेतली आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेचा कारभार लोकाभिमुख, प्रभावीपणे राबविण्यासाठी पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कामात पारदर्शकपणा, सातत्य कायम ठेवण्यासाठी पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही व्यक्तींकडून दिवाळी भेट वस्तू स्वीकारू नये.

अशाप्रकारची भेट वस्तू कर्मचारी, अधिकाऱ्याने स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींमार्फत स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७१ मधील कलम १२ नुसार कारवाई केली जाईल. तसेच संबंधिता विरुध्द शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -