Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीपुण्यात ढगफुटी!

पुण्यात ढगफुटी!

पुणे : मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरात हाहाकार उडाला आहे. विविध ठिकाणी नागरिक पाण्यात अडकल्याचे समोर आले आहे. शहरांतील अनेक परिसरात, घरांमध्ये तसेच प्रसिद्ध दगडूशेठ मंदिरातही पावसाचे पाणी शिरले.

पुणे पाषाण रोड येथील चव्हाण नगर येथे मध्यरात्री अडीच वाजता झाड पडण्याची एक दुर्घटना घडली. यात एक दुचाकीस्वार जखमी झाला. पुण्यातील मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. अग्निशमन अधिकाऱ्यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले.

कोंढवा खुर्द भाजी मंडईलगत एका ठिकाणी सात नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. या सर्व सात लोकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी दोरीचा वापर करण्यात आला.

सुखसागर नगर, अंबामाता मंदिर-कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड-रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ-सुखसागर नगर, डॉल्फिन चौक-बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर-हडपसर, गाडीतळ- शिवाजीनगर पोलिस मुख्यालय-मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम-कसबा पेठ, फिश मार्केट जवळ-कुंभार वाडा समोर-नारायण पेठ, मोदी गणपती-औंध, डिएव्ही स्कुल गल्ली-कसबा पेठ, पवळे चौक-कसबा पेठ, भुतडा निवास-पर्वती, मिञमंडळ चौक-गंज पेठ-भवानी पेठ आदी भागात घरांमध्ये पाणी शिरले.

तर सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाड कोसळण्याच्या तीन घटना घडल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -