मुंबई : रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) ३६ वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर खजिनदारपदी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सौरव गांगुलीनंतर आता रॉजर बिन्नी हे पद स्वीकारणार आहेत. रॉजर बिन्नी यांनी या पदासाठी एकट्याने नामांकन केले होते. त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित मानले जात होते. रॉजर बिन्नी सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, ९ हजार ६२९ कोटींच्या खजिन्याची चावी आता शेलार यांच्याकडे असणार आहे. तीन वर्षांच्या कार्यकाळात बीसीसीआयच्या तिरोजीत जवळपास ६००० कोटींची भर पडल्याची माहिती माजी खजिनदार अरुण धुमाळ यांनी बैठकीत दिली.