Wednesday, January 15, 2025
Homeदेश‘सुट्टी घेऊन मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई’

‘सुट्टी घेऊन मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई’

१,०१७ कॉर्पोरेट कंपन्या मतदानासाठी ठेवणार नोकरदारांवर लक्ष, कर्मचाऱ्यांचे नाव झळकणार कंपनीच्या नोटीस बोर्डवर, गुजरात विधानसभा निवडणुकीपासून होणार सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकी मतदानादरम्यान, नोकरदारांना विशेष सुट्टी जाहीर करण्यात येते. मात्र बहुतांश लोक सुट्टी घेऊन पिकनिकचा प्लान करतात. अशा मतदान न करणाऱ्या नागरिकांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा प्लॅन आखला आहे. याची सुरुवात गुजरात विधानसभा निवडणुकीपासून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने १ हजारांहून अधिक कार्पोरेट कंपन्यांसोबत एक करार केला आहे. त्यानुसार या खासगी कंपन्या मतदानाची सुट्टी घेणाऱ्या आणि मतदान न करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी खासगी कंपन्या नोडल अधिकारी नियुक्त करणार आहे. हा अधिकारी मतदान न करणाऱ्या नोकरदारांवर लक्ष ठेवणार आहे. एवढेच नव्हे, तर मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव कंपनीच्या वेबसाइटवर झळकणार आहे. तसेच नोटीस बोर्डावरही अशा कर्मचाऱ्यांचे नाव लिहिले जाणार आहे.

गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आम्ही २३३ एमओयूवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यासाठी या कंपन्या आमची मदत करणार आहेत. गुजरातमध्ये पहिल्यांदा १,०१७ कॉर्पोरेट कंपन्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे, असे पी. भारती यांनी सांगितले आहे.

आयोगाकडून गुजरामध्ये १०० हून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या उद्योगांवर लक्ष देण्यात येणार आहे. या उद्योगांना त्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले आहे. मतदान न करणाऱ्या कामगारांची हे अधिकारी यादी तयार करतील. अशाच प्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील मतदान न करणाऱ्या कामगारांवरही नजर ठेवली जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -