डेहराडून : उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये मंगळवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. केदारनाथपासून २ किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टीमध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्तकाशीहून हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. हेलिकॉप्टर केदार घाटीकडे जात असताना गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये ७ जण होते असे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत सर्वांचाच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.
हे हेलिकॉप्टर आर्यन हेली या खासगी कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कंपनी उत्तरकाशीची आहे. ही कंपनी केदारनाथच्या दर्शनासाठी भाविकांना टूर पॅकेज देते. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.