कणकवली (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांचे २००९ मध्ये एक कोटी रुपयांची असलेली प्रॉपर्टी २०१९ पर्यंत १५० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. या अनधिकृत प्रॉपर्टीची चौकशी सुरू आहे. यांच्या नातेवाईकांच्या नावाने सिंधुदुर्ग, अलिबाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, येथे शेतजमीन ४५ कोटी तर बिनशेती प्रॉपर्टी ३५ कोटींची आहे. लोअर परेल मध्ये, दादर मध्ये, पुणे रायगड, अलिबाग, मुरुड येथील फ्लॅटची किंमत ३५ कोटीची आहे. त्याशिवाय व्यवसायिक प्रॉपर्टी ८० कोटींच्या बाहेर आहे. २००९ ते २०१९ या काळात आमदार वैभव नाईक यांची प्रॉपर्टी ३०० पटीने वाढली असा एसीबीचा दावा आहे.
हे आजच्या कुडाळमधील मोर्चात उन्हातान्हात सहभागी झालेल्या सामान्य शिवसैनिकांना का सांगितली नाही. ही प्रॉपर्टी स्वतःची आणि नातेवाईकांची केली शिवसेनेकांना एक रुपया तरी मिळाला का ? त्यांचा वापर करून तुम्ही अनधिकृतपणे संपत्ती कमवता आणि याचा जाब एसीबीने विचारला तर हे सोंगाडे आणि भटके कुत्रे मोर्चात आणता. एवढ्या बेनामी प्रॉपर्टी जर कोणी बनवल्या असतील तर त्याला चौकशीला सामोरे जावेच लागेल. या बेनामी प्रॉपर्टी चे उत्तर त्या नपुंसक उद्धव ठाकरेंनी, आणि शिक्षकाच्या कारट्या भास्कर जाधव ने द्यायला हवीत. शेम्बड्या मुलासारखे रडत बसण्यापेक्षा हिंम्मत असेल तर भास्कर जाधव च्या मांडीवर बसून रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात जाऊन चौकशीला सामोरे जा आणि उत्तर द्या असे आव्हान आमदार नितेश राणेंनी आमदार वैभव नाईक याना दिले.
उद्धव ठाकरेंच्या भटक्या कुत्र्यांनी कुडाळमध्ये आमच्यावर भुंकण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे हा नपुंसक नेता आहे. स्व. बाळासाहेबांसारखा थेट हल्ला करण्याचे धाडस उद्धव मध्ये नाही. उद्धव यांना असलेच सोंगाडे आणि भटकी कुत्री लागतात. अशा खरमरीत शब्दांत आक्रमक झालेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
आईस्क्रीम कोनचा आणि आदित्य ठाकरे चा काय संबंध हे दिनो मारिओ ला विचारा. दोघेही रिझवी कॉलेज च्या मागे बसून हे आईस्क्रीम कोन खायचे. उद्धव ठाकरे चे रक्त थंड आहे. म्हणूनच त्याला आईस्क्रीम कोन निशाणी निवडणूक आयोगाने दिली. भास्कर जाधव शिक्षकाचा मुलगा स्वतःला म्हणवतात. पण शिक्षकांचा मुलगा असा करंटा कसा असेल ? तो चिपळूणच्या कचरा पेटीतून उचलून नेलेला अनौरस पुत्र तर नाही ना असा सवाल ही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.
आमदार वैभव नाईकची एसीबी चौकशी का सुरू आहे ? एकीकडे चोरीमारी करून वैभव नाईक दोन नंबरची संपत्ती गोळा करणार आणि दुसरीकडे ही भटकी कुत्री येऊन राणेंवर गरळ ओकणार. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणार असतील तर आम्ही ऐकून घेणार नाही. सोंगाड्याना एकत्र करून नंगा नाच आज कुडाळात केला.
मुद्दा आमदार वैभव नाईकांच्या एसीबी चौकशीचा होता. वैभव नाईक यांनी जनतेसमोर जाऊन आपण स्वच्छ प्रतिमेचा असल्याचे जाहीर करणे गरजेचे होते. मात्र राणे आणि भाजपावर तोंडसुख घ्यायचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर टीका करायची येवढेच काम यांनी केले. वैभव नाईक ची तक्रार करणारा प्रदीप भालेकर हा खासदार विनायक राऊत यांचा माणूस होता. मग भालेकर ला वैभव नाईक विरोधात तक्रार द्यायला खासदार राऊत यांनीच भाग पाडले या माझ्या मुद्द्यावर विरोधक का बोलले नाहीत? असा सवाल नितेश राणेंनी केला.
आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांचे निवडणूक वेळी सादर केलेले प्रतिज्ञापत्र दाखवत आमदार नाईक यांची २००९ साली प्रॉपर्टी ५० लाख ते १ कोटी ची होती. २०१४ साली नाईक यांची हीच प्रॉपर्टी १ कोटीवरून ८ कोटींवर पोचली. २०१९ मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार नाईक यांनी आपली प्रॉपर्टी २५ कोटींची असल्याचे सांगितले आहे. ह्या अधिकृत प्रॉपर्टी आहेत तर बेनामी प्रॉपर्टी १४० ते १५० कोटींची असल्याचा दावा आमदार नितेश राणेंनी केला. ही वाढलेली संपत्ती वैभव नाईक आणि चिपळूण वरून भाड्याने आलेल्या भटक्या कुत्र्यांनी एसीबीला उत्तर म्हणून द्यावे. तसे नाकारता त्याऐवजी केंद्रीय मंत्री राणे, माजी खासदार निलेश राणे आणि माझ्यावर तसेच भाजपावर दात चावण्याला काय अर्थ आहे? असा सवालही नितेश यांनी केला.
ज्या राणेंवर भास्कर जाधव टीका करतात ते जाधव स्वतःच्या मुलाला केवळ जिल्हा परिषद मध्ये पाठवू शकला. पण राणेंनी आपल्या मुलाला खासदार बनवले. मला दोन वेळा आमदार केले. राणे स्वतः मुख्यमंत्री झाले, केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत. भास्कर जाधव फक्त नगरविकास राज्यमंत्री होऊ शकले. अशा जहाल शब्दांत नितेश राणेंनी भास्कर जाधवांचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांची नक्कल करणारा भास्कर जाधव हा नालायक माणूस आहे. शिंदे सरकार मध्ये येण्यासाठी भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांनी किती खटाटोप केला हे आम्हाला माहिती आहे. त्यांना गेट आउट म्हणून सांगण्यात आले होते असा गौप्यस्फोटही नितेश राणेंनी केला.