Wednesday, March 19, 2025
Homeकोकणरत्नागिरीदेवरूखमध्ये पोलिस इन्स्पेक्टर असल्याची थाप मारत दागिन्यांची चोरी

देवरूखमध्ये पोलिस इन्स्पेक्टर असल्याची थाप मारत दागिन्यांची चोरी

देवरूख ठाण्यात गुन्हा दाखल, घटना सीसीटीव्हीत कैद, भरदिवसा घडली घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

साडवली (वार्ताहर) : आपण पोलिस इन्स्पेक्टर आहोत, असे सांगून वृद्ध महिलेकडील दोन सोन्याच्या पाटल्या व दोन सोन्याच्या बांगड्या असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना साडवली सह्याद्रीनगर येथे घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धीरज देसाई यांनी देवरूख पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. धीरज देसाई यांची आई कल्पना अनंत देसाई या सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास देवरूख संगमश्वेर या मुख्य रस्त्यावरून ये-जा करत होत्या. याचवेळी एका व्यक्तीने त्यांना आपण पोलीस इन्स्पेक्टर आहोत असे सांगितले.

आताच चोरी झाली असून, तुम्ही सोन्याचे दागिने अंगावर घालून फिरू नका, असे सांगितले. हातातल्या बांगड्या व पाटल्या काढून कागदात ठेवण्यास सांगितले. याचवेळी या व्यक्तीने हातचलाखी करत सोन्याच्या बांगड्या आपल्या ताब्यात घेत नकली बांगड्या कल्पना देसाई यांच्याकडे सुपूर्द केल्या. गळ्यातील सोन्याची चेनदेखील तो मागत होता. मात्र त्यांनी ती काढली नाही. कल्पना देसाई या घरी गेल्यानंतर कागदामध्ये नकली बांगड्या असल्याचे दिसून आले.

प्रकार सीसीटीव्हीत कैद हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या इसमाला दुचाकीवरील दोन जणांनी सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -