डॉ. सर्वेश सुहास सोमण
आपण आपल्या ३ ऑक्टोबरच्या लेखात सांगितल्याप्रमाणे अनेक दिवसांच्या घसरणीनंतर निर्देशांकांच्या घसरणीला तात्पुरता विराम मिळाला असून निफ्टीची १६८०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत निर्देशांकांतील तेजी कायम राहील. ज्यामध्ये निफ्टी १७२०० पर्यंत मजल मारणे अपेक्षित आहे हे सांगितलेले होते.आपण सांगितल्यानंतर निफ्टीने १७४०० पर्यंत मजल मारलेली आहे. त्याच लेखात टेक्निकल अॅनालिसिसनुसार मध्यम मुदतीच्या चार्टनुसार “सिप्ला” या शेअरने १०८३ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत तेजी सांगणारी रचना तयार केलेली आहे. त्यामुळे या शेअरमध्ये पुढील काळात अल्पमुदतीत चांगली वाढ होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आज १११४ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये योग्य पद्धतीने स्टॉपलॉस ठेवून तेजीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल हे सांगितलेले होते. त्यानंतर या शेअरने ११५० पर्यंत मजल मारलेली आहे. त्याप्रमाणे ३ ऑक्टोबरच्या लेखात आपण “टाटा इन्व्हेस्ट” या शेअरने देखील करेक्शन दाखविले असून २३०२ रुपये किमतीला असतानाच आपण हा शेअर परत एकदा मोठी तेजी दाखवू शकतो हे सांगितलेले होते. आपण सांगितल्यानंतर केवळ ४ दिवसांत म्हणजेच ७ ऑक्टोबरला या शेअरने २५०८ रुपये किमतीपर्यंत मजल मारली. पुढील आठवड्याचा विचार करता शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गॅपअप आणि गॅपडाऊन अशी हालचाल सुरू आहे. निर्देशांकात गेल्या आठवड्यापासूनच हा रोलर कोस्टर सुरू आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात सावधानतापूर्वक व्यवहार करणे अत्यंत आवश्यक आहे. चार्टचा विचार करता निफ्टी पुढील आठवड्यासाठी १७००० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. जोपर्यंत ही पातळी तुटत नाही तोपर्यंत निर्देशांकात पुन्हा तेजी होणे अपेक्षित आहे. पुढील आठवड्याचा विचार करता १७४०० ही विक्रीची पातळी असून जोपर्यंत निफ्टी ही पातळी ओलांडत नाही तोपर्यंत नवीन मोठी तेजी येणार नाही.
मध्यम मुदतीच्या चार्टनुसार आयडीएफसी, अतुल ऑटो, सनफार्मा यांसह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे. कमोडीटी मार्केटचा विचार करता टेक्निकल अॅनालिसिसनुसार या सोन्याची दिशा आणि गती ही अल्पमुदतीसाठी मंदीची आहे. आता सोन्याची ४८८०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे जोपर्यंत सोने या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोने बाऊन्स करू शकते. टेक्निकल चार्टनुसार कच्चे तेलाची दिशा आणि गती ही तेजीची झालेली असून कच्चे तेलाची ६६०० ते ६८०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी असून जोपर्यंत या पातळीच्या वर कच्चे तेल आहे तोपर्यंत कच्च्या तेलात बाऊन्स होऊ शकतो ज्यामध्ये कच्चे तेल ७३०० पर्यंत वाढ दाखवू शकते.