मुंबई : भाजपतर्फे भांडुपमध्ये मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक ११५ तर्फे खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार शाम सावंत यांच्या सहकार्याने भांडुप विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. निकिता नंदकुमार घाडीगावकर यांच्या वतीने सर्वोदय नगर येथील भाजपा कार्यालयात मोफत आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज सोमवारी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. बुधवार, १९ तारखेपर्यंत या शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरामध्ये आधार कार्ड अद्ययावत, नवीन आधार कार्ड काढण्यासाठी मदत केली जात आहे. अनेक नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्ध यांच्या आधार कार्डात त्रुटी असल्याने घाडीगावकर यांच्या विशेष प्रयत्नाने आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिराच्या उद्घाटनावेळी शाम सावंत, रितेश शाम सावंत, दीपक भोईटे, मुकेश बिगानिया, अजित काळे, वर्षा गोलतकर, नारायण परब, विजय सुतार, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आधार कार्ड शिबिर यशस्वी करण्यासाठी भांडुप भाजपा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.