Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेकल्याण-मोहने परिसरात ४१ लाखांची वीजचोरी उघडकीस

कल्याण-मोहने परिसरात ४१ लाखांची वीजचोरी उघडकीस

१३९ वीज चोरांविरुद्ध कारवाई

कल्याण (वार्ताहर) : महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागातील मोहने वीज वाहिनीवरील वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात या वाहिनीवरील १४९ वीज चोरट्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून ४१ लाख ५७ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या भागात वीज चोरांविरुद्धची कारवाई निरंतरपणे सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

मोहने वीजवाहिनी क्रमांक सातद्वारे वडवली, अटाळी, आंबिवली, नवनाथ नगर, संतोषीमाता तसेच आंबिवली स्टेशन या परिसरास वीज पुरवठा केला जातो. कल्याण पश्चिम विभागात या वाहिनीची वीजहानी सर्वाधिक आहे. ही वीजहानी कमी करण्यासाठी उच्चदाब व लघुदाब तारा बदलणे, पोलवरील अतिरिक्त सर्व्हीस वायर काढणे, निकामी मीटर बदलणे आणि वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्याच्या उपाययोजना सुरू आहेत.

गेल्या दीड महिन्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार १३९ वीज चोरांवर कारवाई करून ४१ लाख ५७ हजार ८७० रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक देण्यात आले आहे. विहित मुदतीत वीजचोरीच्या देयकाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. घरात मीटरच्या इनकमिंग वायरला जॉईंट असणे, मिटर बायपास करणे, मिटरचे एम-सील तोडणे, मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -