कॅनबेरा (वृत्तसंस्था) : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेकरिता आयसीसीने समालोचकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तीन भारतीयांचा समावेश आहे. समालोचकांची या यादीमध्ये भारताकडून हर्षा भोगले, रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांचा समावेश आहे.
या यादीत इयॉन मॉर्गन, प्रेस्टन मॉमसेन, डेल स्टेन आणि नियाल ओब्रायन यांसारखे माजी क्रिकेटपटूही सामन्यादरम्यान समालोचन करताना दिसतील. टी२० विश्वचषक स्पर्धेत १६ संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी नामांकित २९ समालोचकांच्या गटात मेल जोन्स, इसा गुहा आणि नताली जर्मनोस महिला समालोचक म्हणून काम पाहतील.
अॅडम गिलक्रिस्ट, अतहर अली खान, बाजिद खान, ब्रायन मुर्गट्रोयड, कार्लोस ब्रैथवेट, डेल स्टेन, डैनी मॉरिसन, डिर्क नानेस, इयोन मॉर्गन, हर्षा भोगले, इयान बिशप, इयान स्मिथ, ईसा गुहा, मार्क हॉवर्ड, मेल जोन्स, माइकल एथरटन, माइकल क्लार्क, नासिर हुसैन, नताली जर्मनोस, नियाल ओ’ब्रायन, पोम्मी मबांगवा, प्रेस्टन मोमसेन, रवि शास्त्री, रसेल अर्नोल्ड, सैमुअल बद्री, शेन वॉटसन, शॉन पोलक, साइमन डोल, सुनील गावस्कर असा टी-२० विश्वचषकासाठी समालोचन पॅनेल आहे.