मजा मजा...

  104

सुमती पवार

चिऊ ताई आली नि नाचून गेली
कित्ती कित्ती मजा ही झाली…...
काव काव काव कावळे दादा
आहे कित्ती साधासुधा...
मोराचा मात्र न्याराच थाट
सारेच आहेत त्याचे भाट...
लक्ष डोळे सुंदरसे नि …
पिसांचा गुच्छ असतो दाट... …
पोपट दादा हिरवागार
मिठ्ठास वाणी बोलतो फार...
पेरू मिरची खातो डाळ
भावाला माझ्या म्हणतो बाळ... …
घार नि गरुड त्यांचे गारुड
बांकदार चोची बघतात वरून...
उचलती साप, मेंढरे वर
डोंगर-कपारीत त्यांचे घर...
घुबड घुमते घू घू घू
होला ही बोले हूं हूं हूं...
पक्ष्यांची बोली गोड गोड गोड
कावळा मात्र मोडतो खोड...
Comments
Add Comment

गोष्ट एका उंदराची!

कथा : रमेश तांबे एक होता उंदीर. तो एका घरात राहायचा. घरभर फिरायचा. मि

सूर्य चालताना का दिसतो?

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यची त्याच्यासारख्याच एका हुशार पण गरीब मुलासोबत आता चांगली ओळख झाली होती. तो मुलगा

इलो मिरग

वैष्णवी भोगले खरंच कोकणातल्या मिरगाच्या पावसाची एक वेगळीच मज्जा असते. कोकण तसं वर्षभर सुंदर दिसलं तरी अधिक

सिडनीमध्ये मुंबईचा वडा-पाव

अजित राऊत आम्ही ऑस्ट्रेलियात अनेक प्रेक्षणीय ठिकाणी फिरलो. त्यातील प्रमुख म्हणजे सुप्रसिद्ध ऑपेरा हाऊस, तसेच

काव्यकोडी

एकनाथ आव्हाड गुरुजी गुरुजी आमचे रोजच फळ्यावर लिहायचे सुविचार म्हणायचे सुविचारासारखा

मेरी बात और हैं...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे साहिर म्हणजे तरल शायरीचा हॉलमार्क! हळव्या, उत्कट भावना तळहातावर घेऊन तुमच्या