Monday, November 3, 2025

मजा मजा...

सुमती पवार चिऊ ताई आली नि नाचून गेली कित्ती कित्ती मजा ही झाली…... काव काव काव कावळे दादा आहे कित्ती साधासुधा... मोराचा मात्र न्याराच थाट सारेच आहेत त्याचे भाट... लक्ष डोळे सुंदरसे नि … पिसांचा गुच्छ असतो दाट... … पोपट दादा हिरवागार मिठ्ठास वाणी बोलतो फार... पेरू मिरची खातो डाळ भावाला माझ्या म्हणतो बाळ... … घार नि गरुड त्यांचे गारुड बांकदार चोची बघतात वरून... उचलती साप, मेंढरे वर डोंगर-कपारीत त्यांचे घर... घुबड घुमते घू घू घू होला ही बोले हूं हूं हूं... पक्ष्यांची बोली गोड गोड गोड कावळा मात्र मोडतो खोड...
Comments
Add Comment