मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपने निवडणूक लढवू नये, असे ट्वीट केले आहे.
सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीवर लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भारतीय जनता पक्षाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मात्र अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. दिवंगत आमदार रमेश लटके हे आपल्या सर्वांचे सहकारी होते. त्यामुळे सहानुभूतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार या निवडणुकीत देऊ नये अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022