Wednesday, July 9, 2025

मंबई-गोवा महामार्गावरील कामाला संतापलेल्या 'पेण'करांनी... आज रास्ता रोको

मंबई-गोवा महामार्गावरील कामाला संतापलेल्या 'पेण'करांनी... आज रास्ता रोको

मुंबई : मंबई-गोवा या महामार्गावर रस्त्याला वैतागलेल्या कोकणवासियांनी आज रास्ता रोको आंदोलन केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अडवून पेणकरांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.


कामाला दिरंगाई करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. 'माझे पेण' या सामाजिक संस्थेच्या वतीने संघटनेच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात पेण तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे.


कोकण आणि रायगडवासियांची थट्टा थांबवून, १८ हजार बळी घेणाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. शिवाय हा रस्ता सिमेंटचा करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या आंदोलनामध्ये यमराजाच्या 'अवतारा'मध्ये आंदोलक सहभागी झाले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >