ठाणे : ठाण्यात मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपी रिक्षाचालकाने दिली आहे. काल सकाळी ७ वाजता एक विद्यार्थिनी बाजारपेठेत पायी जात असताना रिश्रा चालकाने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. मुलीने त्याला जाब विचारल्यानंतर रिक्षाचालकाने तिचा हात पकडून फरफटत नेले. त्यानं तरुणीला फरफटत काही अंतर पुढे नेले. तरुणीच्या हाताला दुखापत झाल्याने ती रस्त्यात पडली. त्यानंतर रिक्षाचालक स्थानकाच्या दिशेने फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर दिघा भागात राहणाऱ्या या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी रिक्षाचालक कटिकादाला उर्फ राजू आब्बायी विरांगनेलू हा मूळचा आंध्र प्रदेशातला आहे.
दरम्यान, या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले त्या परिसरात होते. संपूर्ण प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांशी पाठपुरावा करून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा केले. त्यानंतर या तरुणीसोबत ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचा नंबर मिळवला आणि रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. अखेर तब्बल २४ तासांनी मुजोर रिक्षाचालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…