पोह्यावरची शेव!

डॉ. मिलिंद घारपुरे


कंपनीमधलं एक ट्रेनिंग. बरी असतात अशी ट्रेनिंग अधूनमधून. एक वेगळा दिवस. मस्त खानपान आणि गुंगी आणणारी एसीमधली लेक्चर्स...!
असंच एक लेक्चर. विषय ‘टीम वर्क.’ अन् एका गमतीदार वाक्याने गुंगी उतरली...
"You should not be a just like a Toppings on pizza" which can be removed any time."
शुद्ध मराठीत. ‘तुम्ही पोह्यावरच्या शेवेसारखे फक्त चव वाढवण्यापुरते राहू नका."
कुरकुरीत वाक्य, त्या शेवेसारखंच... गरमागरम वाफाळत्या उपम्यावर किंवा पोह्यावर पेरलेली खुसखुशीत शेव, असली तर छानच!!... नसली तर?? तरी फारसा काही फरक पडत नाही... किंबहुना एखाद्याला आवडत नसेल, तर ती शेव अलगद बाजूला करता येते.


आता या वाक्याला कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यायचं का टीका? कॉम्प्लिमेंट अशासाठी की तुमच्या अस्तित्वामुळे सहभागामुळे गंमत येते. टीका याच्यासाठी की, तुम्ही एवढे काही महत्त्वाचे नाही आहात. कधीही सहज बाजूला सारले जाऊ शकता. तुम्ही ऑफिसमधल्या एखाद्या प्रोजेक्टचा भाग असाल किंवा एखाद्या मोठ्या कुटुंबाचा... असलात काय, नसला काय असं असण्यापेक्षा... पोह्यावर वरून पेरलेल्या शेवेपेक्षा लिंबाच्या रसासारखे होऊयात, इतके सहज मिसळून जाऊ की, चव तर वाढवूच आणि बाजूला काढणे पण अशक्य!!

Comments
Add Comment

मुलांना तणावमुक्त ठेवा

मुलांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा बारावी-दहावी परीक्षा राज्यात सुरू झाल्या आहेत. या

सातत्यपूर्ण पाठबळ हवे

आयटी क्षेत्रासाठी यंदाचा अर्थसंकल्प सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण ठरतो. कर सुलभीकरण, डिजिटल पायाभूत

अमेरिका-‘जमात’ हातमिळवणी

बांगलादेशमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाशी संबंध सुधारण्यावर अमेरिका लक्ष केंद्रित करत आहे. पाकिस्तानशी चांगले

आणखी एक बस अपघात

गेल्या आठवड्यातच बेस्ट उपक्रमात खासगीकरण का नको यावर प्रकाश टाकत असतानाच दुर्दैवाने भांडुप बेस्टचा अपघात घडला.

बंदरांच्या आधुनिकीकरणातून अर्थशक्तीचा उदय

भारताचा सुमारे ९५ टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो. समुद्र हा भारताच्या व्यापाराचा जीवनमार्ग आहे. कच्चे तेल आणि

नारळ लागवडीतून कोकणच्या अर्थव्यवस्थेला बळ

समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांनी जास्तीत जास्त नारळाची लागवड करावी. यामुळे नारळ प्रक्रिया उद्योगाला चालना