Sunday, July 14, 2024
Homeकोकणरायगडमुरूड अंगणवाडी सेविकांनी दिला सामूहिक राजीनामा

मुरूड अंगणवाडी सेविकांनी दिला सामूहिक राजीनामा

मानधन नाही, त्यातच नायब तहसीलदारांनी वापरले अपशब्द

मुरूड (वार्ताहर) : सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहचवण्याचे काम प्रामुख्याने अंगणवाडी सेविका करतात. कोरोना कालावधीत आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी काम केले होते. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गैरवर्तुणूकीमुळे अंगणावाडी सेविकांनी सामूहिकपणे बीएलओ पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले आहे.

नजीकच्या कालावधीत स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक विभागही जोरदारपणे कामाला लागले आहे. निवडणुकीच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. निवडणुकीच्या कामासंबंधी गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन मुरुड प्रशासनाकडून करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविकांना बीएलओचे काम देण्यात आले. गेल्या सात वर्षापसून ते सदर काम करत आहेत. मात्र त्यांच्या मानधनाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.

या बैठकीत मानधनाबाबत विचारले असता, नायब तहसीलदार अमित पुरी यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनाम दिला. यावेळी अमित पुरी यांनी महिलांना अपशब्द वापरले, तसेच दमदाटी केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्यती कारवाई करावी आणि महिलाना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली. दरम्यान, अमित पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, अंगणवाडी सेविकांनी नेमके निवेदनात काय म्हटले आहे हे मला माहिती नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, असे सांगितले.

अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेले निवेदन मी वाचले आहे, मात्र त्यामध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत. तसे काहीच झालेले नाही. बीएलओचे मानधन दिलेले आहे. सोमवारी अंगणवाडी सेविकांची बैठक बोलावण्यात येईल आणि त्यांचे काय प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यात येतील. -रोहन शिंदे, तहसीलदार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -