मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी एक ट्वीट करत किशोरी पेडणेकरांचा थेट उल्लेख न करता त्यांची ‘कांदे बाई’ म्हणत खिल्ली उडवली आहे.
नवीन नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रबोधन यात्रेत अद्याप मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दिसल्या नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही किशोरी पेडणेकरांची खिल्ली उडवली आहे. शिल्लक सेनेकडून मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपऱ्यांना संधी दिली जात असल्याचेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
अंधारात तिर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे..महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून त्यांनी प्रमुखांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही.
मूळ सैनिक यांच्यावर अन्याय करून उपऱ्याना संधी ही नवीन शिल्लक सेना..अजब आहे.— Shalini Thackeray (@ThakareShalini) October 15, 2022