Saturday, July 5, 2025

एक्सबीबी व्हेरिएंटचा भारतात शिरकाव

एक्सबीबी व्हेरिएंटचा भारतात शिरकाव

मुंबई (प्रतिनिधी) : चीनसह अन्य देशांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. माहितीनुसार कोविडचा आणखी एक घातक व्हॅरिएंट आढळून आला आहे. ज्याचे नाव आहे एक्सबीबी व्हेरिएंट. गेल्या आठवड्यापासून रूग्णसंख्येत वाढ झाल्याने शास्त्रज्ञही चिंतेत पडले आहे. तर युरोपीय देशाच्या शास्त्रज्ञांनी आणखी एक कोरोना लहर येण्याचे संकेत दिले आहेत. त्यातच आता हाँगकाँगमध्ये कोरोनाचा नवा व्हॅरिएंट आढळून आला आहे.


मीडिया रिपोर्टनुसार हाँगकाँगमध्ये कोविड १९चा सब एक्सबीबी व्हेरिएंट आढळून आला. या व्हॅरिएंटवर व्हॅक्सिनचाही प्रभाव दिसून येत नाही. मानवी प्रतिकार शक्तीलाही मात देत हा व्हॅरिएंट संसर्ग वेगाने पसरवणारा दिसून येतो. शास्त्रज्ञांच्या मते या व्हरिएंटमुळे अनेक देशांमध्ये परिस्थिती बिघडण्याचीही शक्यता आहे.


त्यामुळे हा नवा व्हरिएंट नेमका काय आहे आणि याची लक्षणे कशी आहेत ते जाणून घेणे महत्वाचे ठरते. भारतात तमिळनाडूमध्ये एक्सबीबी व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आले. तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडूमध्ये नव्या व्हॅरिएंटच्या रूग्णांची नोंद केल्या गेली. या सगळ्या भागांमध्ये एकूण ६७ रूग्ण आढळून आले.

Comments
Add Comment