जळगाव (प्रतिनिधी) : ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्यांचे जाबजबाब घेतल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतीलच, त्यामुळे पाच-सहा दिवस वाट बघायला हवी. त्यासाठी गुन्हा नोंदवून घेण्यासाठी एवढे नाटक करण्याची एकनाथ खडसे यांना गरज काय, असा टोला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. दूध संघाच्या गैरव्यवहारप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
जिल्हा दूध संघातील चोरी, अपहार प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी एकनाथ खडसे यांनी तब्बल नऊ ते दहा तास शहर पोलीस ठाण्यात आंदोलन केले. यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघातील गैरव्यवहाराबाबत सुरवातीला तक्रार दिली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना सुचले आणि त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिस चौकशी करत असतानाही गुन्हा नोंद करण्यासाठी त्यांचे नाटक सुरू आहे.
जिल्हा दूध संघातून एक ते दोन कोटी रुपयांचा एवढा माल बाहेर गेलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करून मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की दूध संघाचे अध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक यांच्या संमतीशिवाय ते होऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांच्या जाबजबाबानंतर सर्व गोष्टी समोर येतील. पाच-सहा दिवस वाट बघायला हवी होती, सर्व समोर येणारच आहे. त्यासाठी एवढे नाटक करण्याची कोणतीही गरज नव्हती. गेल्या महिन्यांत दूध संघात ५२५ रुपये भावाचे तूप ९५ रुपये दराने विक्री करण्यात आले, ती तक्रार आमच्या आमदारानेच केली, ते सिद्ध झाले, यात काही जणांना निलंबित करण्यात आले.
अशा पद्धतीने दूध संघात सर्व ठिकाणी गैरव्यवहार चालला आहे, भ्रष्टाचार आणि गडबड चालली आहे, याची चौकशी पोलिसांमार्फत नाही तर एसआयटीमार्फत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणणीस यांच्याकडे करणार आहोत. त्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येतील, असे या वेळी मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…