Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीठाकरेंच्या 'मशाल' पाठोपाठ शिंदेंचे 'ढाल-तलवार' चिन्हही वादात

ठाकरेंच्या ‘मशाल’ पाठोपाठ शिंदेंचे ‘ढाल-तलवार’ चिन्हही वादात

'मशाल' चिन्हाला समता पार्टी तर 'ढाल-तलवार' चिन्हाला शीख समाजाचा विरोध

मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या ‘मशाल’ चिन्हाविरोधात समता पार्टीने न्यायालयात धाव घेतलेली असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ढाल-तलवार’ चिन्हावर नांदेडच्या शीख समाजातर्फे आक्षेप घेण्यात आला आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले आहे.

त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याकारणाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते नाकारले. याप्रमाणे ढाल-तलवार हेदेखील खालसा पंथाचे धार्मिक प्रतीक आहे, त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगाने द्यायला नको होते. या संदर्भातील निर्णय नाही झाला तर रणजीत सिंह न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे. तर शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळते जुळते असल्याने त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी कामठेकर यांनी केली आहे. तसे, निवेदनही त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.

निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव वापरण्यास ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाणही गोठवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला पक्षचिन्ह आणि पक्षाची नावे दिली आहेत. यात निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव देण्यात आले आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले. तर शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -