मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दूध दरवाढीचा मोठा झटका बसला आहे. अमूल दूधाच्या दरवाढीनंतर आता मदर डेअरीने त्यांच्या फुल क्रिम आणि गायीच्या दूधाच्या किमती २ रुपये प्रतिलिटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर १६ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होतील असे कंपनीकडून सष्ट करण्यात आले आहे. लागू करण्यात आलेली ही दरवाढ दिल्ली आणि एससीआरमध्ये लागू असणार आहे.
शनिवारी सकाळीच अमूलने त्यांच्या दूध दरात प्रति लीटर २ रुपयांची वाढ करत असल्याचे जाहीर केले होते. सध्या अमूलच्या एका लीटर दुधासाठी ६१ रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर आता एका लिटर दुधासाठी ६३ रूपये मोजावे लागणार आहेत.
आजपासून अमूलने ही दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवाळीच्या तोंडावर महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. त्यानंतर आता दिल्ली एससीआरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना झटका बसला असून, मदर डेअरीने त्यांच्या फुल क्रिम आणि गायीच्या दुधात प्रति लीटर २ रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. करण्यात आलेली दरवाढ १६ नोव्हेंबरपासून लागू होईल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.