सातपूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच पोलिसांनी कडक पावले उचलले असून, चोरीच्या घटना रोखण्यासाठी सातपूर, अंबडला स्वतंत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज तैनात केल्याची माहिती मार्गदर्शन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आयमाच्या बैठकीत मार्गदर्शन केले.
सदर बैठक पोलिस आयुक्त नाईकनवरे व आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयमा कार्यालयात झाली. या वेळी पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख, आयमाचे उपाध्यक्ष संदीप पानसरे, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, सरचिटणीस ललित बूब, अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, आयमा तक्रार समितीचे चेअरमन विनायक मोरे आदींसह व्यासपीठावर उपस्थित होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले, की अंबडमध्ये ५२ गुन्हेगारांवर तडीपार, तर सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी सांगितले की सातपूरमध्ये सुमारे १३०० टवाळखोरांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. काही राजकीय नेते व कार्यकर्तेही रडारवर असलेल्यांचे ही संकेत दिले.