नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषक २०२३ स्पर्धेकरिता भारतीय संघ पाकिस्तानला जाऊ शकतो. पण या बाबत अंतिम निर्णय भारत सरकारचा असेल. दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका बंद आहेत. दरम्यान आशिया चषक २०२३ चे यजमानपद भूषवण्याची संधी पाकिस्तानला मिळाली असून बीसीसीआय या स्पर्धेसाठी पाकिस्तानला टीम इंडियाला पाठवण्यास तयार आहे. पण या संदर्भातील अंतिम निर्णय हा भारत सरकारचा असेल. सरकारकडून मान्यता मिळाल्यास २००८ नंतर प्रथमच भारतीय संघ पुढील वर्षी पाकिस्तानला जाऊ शकतो.
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, २०२३ मध्ये आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा पाकिस्तान दौरा निश्चितपणे तत्कालीन सरकारच्या मान्यतेच्या अधीन असेल, परंतु सध्या तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अजेंड्यावर नक्कीच आहे. पाकिस्तान २०२३ च्या उत्तरार्धात ५० षटकांच्या आशिया चषकाचे यजमानपद भूषवणार आहे, त्यानंतर भारतात विश्वचषक होणार आहे. सहाय्यक व्यवस्थापकाच्या (एजीएम) नोटनुसार, बीसीसीआय पाकिस्तानला जाण्यासाठी तयार आहे.
सामाजिक, राजकीय मुद्द्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका बऱ्याच दिवसांपासून खेळली जात नाही. आता दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. पुढील वर्षी आशिया चषक स्पर्धेसाठी सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिल्यास २००८ नंतर प्रथमच भारतीय संघ पाकिस्तानला जाऊ शकतो. आशिया चषकाशिवाय आगामी काळात पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचेही यजमानपद भूषवणार आहे.
१८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सहाय्यक व्यवस्थापकाच्या बैठकीनंतर(एजीए), बीसीसीआयने गुरुवारी सर्व राज्य संघटनांना एक नोट पाठवली आहे, ज्यामध्ये पुढील वर्षापर्यंतचे भारताचे वेळापत्रक आहे. या नोंदीनुसार, भारताला पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत महिला टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर अंडर-१९ आणि टी-२० विश्वचषक खेळायचा आहे. पाकिस्तानमध्ये होणारा आशिया चषक हाही या योजनेचा एक भाग आहे. आशिया चषक पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये एकदिवसीय प्रकारात होणार आहे. या आशिया चषकानंतर भारतात विश्वचषक होणार आहे.