चीन (वृत्तसंस्था) : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा विचार तेथील सरकार करत असून नवीन ट्रॅव्हल गाइडलाइनही जारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, चीनमध्ये ओमायक्रॉनचे दोन नवे व्हेरियंट आढळले आहेत. बीएफ. ७ आणि बीए.५.१.७ या दोन नवीन व्हेरियंटमुळे चीनमध्ये अचानक कोरोनाच्या संख्येत वाढ झाली आहे. चीनमध्ये १० ऑक्टोबरला कोरोनाचे २ हजार ०८९ रुग्ण होते. विशेष म्हणजे २० ऑगस्टनंतरचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे. तर, चीनच्या काही परिसरात बीएफ.७ व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तिथेही रुग्णांच्या संख्येत तिनपटीने वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने नवीन नियम लागू केले आहेत. बाहेरुन नागरिक आल्यानंतर तीन दिवसांच्या आतच त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच, तिथली स्थिती इतकी गंभीर आहे. की शाळा व थिएटरही बंद करण्यात आले आहेत.
चीनमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. त्यासाठी अनेक कारण समोर येत आहेत. चीनमध्ये आठवडाभर चालणाऱ्या एका राष्ट्रीय कार्यक्रमासाठी नागरिक एका शहरातून दुसऱ्या शहरात जात होते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वाढला आहे. कोरोनाच्या ऑमायक्रॉन या सबव्हेरियंटमुळे जगभरात कोरोनाची लाट आल्याचे पाहायला मिळाले आहे. यूके आणि जर्मनीमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या व्हेरियंटबाबत अधिक माहिती पुढे आलेली नाही.
तज्ज्ञांच्या मते, या व्हेरिंयटमुळे रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. पण त्याचे गंभीर लक्षण अद्याप दिसलेले नाही.
दरम्यान, चीन अद्यापही झिरो कोव्हिड रणनितीवर काम करत आहेत. तिथे सातत्याने चाचण्या करण्यात येत आहे. रुग्ण वाढल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात येते. मात्र, आता रुग्ण वाढले आहेत. एकाच दिवसात रुग्णसंख्या २ हजारांवर गेली आहे. चीन कोरोनाचा फैलाव होऊ देणार नाही. मात्र, ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होतो आणि मृत्यूदरही अधिक आहे. लसीकरणानंतरही हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियामध्येही अशीच परिस्थिती आहे.