मुंबई : मागील काही दिवसांपासून अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरूध्द भाजपचे मुरजी पटेल असा सामना पाहायला मिळणार आहे.
मुरजी पटेल हे कमळ या चिन्हावर अंधेरी पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मशाल विरूद्ध कमळ अशी लढत आता पाहायला मिळणार आहे.