सिमला : हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी १२ नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान आणि ८ डिसेंबर रोजी निकाल घोषित होईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी ३ जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे.
६८ सदस्यीय हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होईल. त्यानंतर २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी दाखल करता येईल. तद्नंतर २७ तारखेला उमेदवारी अर्जाची पडताळणी होईल. तर २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारी भरण्याच्या तारखेपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे.