मुंबई : राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे.
दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० एवढी रक्कम अग्रीम म्हणून दिली जाणार असून १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे.