Tuesday, April 22, 2025
Homeदेशभारतातील ५जी टेक्नोलॉजी ही स्वदेशी

भारतातील ५जी टेक्नोलॉजी ही स्वदेशी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अमेरिकेतील या विधानाची जगभरात चर्चा

वॉशिंग्टन : ऑक्टोबरच्या सुरुवातीला देशातील काही प्रमुख शहरात ५जी सर्विस (5G technology in India) सुरू करण्यात आली आहे. ही ५जी टेक्नोलॉजी स्वदेशी असल्याचे मत भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी अमेरिकेत व्यक्त केले. तसेच या टेक्नोलॉजीसाठी काहीही आयात करण्यात आले नाही. हे भारताचे मेड इन इंडिया प्रोडक्ट असल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले. (Nirmala Sitharaman said that the 5G technology in India is completely indigenous.) त्यांच्या या विधानाची आता जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वॉशिंग्टन येथील जॉन्स हापकिन्स स्कूल ऑफ अडवॉन्स्ड इंटरनॅशनल स्टडीज म्हणजेच एसएआयएस मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. भारतातील ५जी टेक्नोलॉजीसाठी देशात इंफ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे. जी पूर्णपणे स्वदेशी आणि स्टँडअलोन आहे. भारत आपली ही ५जी टेक्नोलॉजी अन्य देशांसोबत शेअर करण्यासाठी पूर्ण तयार आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. (She said India can now provide 5G technology to other countries whoever wants it.)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले की, काही पार्ट्स दक्षिण कोरिया सारख्या देशातून आले आहेत. परंतु, अन्य दुसऱ्या जागेहून नाही. त्यामुळे ५जी टेक्नोलॉजी स्वदेशी आहे. आम्ही कोणत्याही देशा सोबत ५जी टेक्नोलॉजी शेअर करण्यासाठी सज्ज आहोत. त्यामुळे आमची ५जी टेक्नोलॉजी आयात करण्यात आलेली नाही. हे आमचे स्वत:चे प्रोडक्ट आहे.

अर्थमंत्र्यांनी म्हटले की, ऑक्टोबरच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन मोबाइल काँगेसमध्ये ५जी सर्विसला हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर देशातील काही प्रमुख शहरात ही सेवा सुरू झाली होती. २०२४ पर्यंत संपूर्ण देशात ५जी सर्विस सुरू करण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -