मुंबई : सकाळपासून ढगाळ वातावरण असलेल्या मुंबईत आज दुपारी दोन वाजल्यापासून पुन्हा एकदा तासभर मुसळधार पाऊस कोसळला.
कोकणासह मराठवाडा आणि विदर्भामध्ये हंगाम संपला तरी पाऊस थांबायचे नाव घेत नाही. काल आणि परवा या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे कोकणातील भातशेतीसह मराठवाडा, विदर्भातील कापूस, सोयाबीनचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.