नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल विधानसभा निवडणूकीपूर्वी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मंगळवारी सकाळी अभिनेत्री कंगना रनौतच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर कंगणा आता राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मंगळवारी सकाळी कंगना रनौत यांच्या घरी जाऊन चर्चा केली. ठाकूर हे जवळपास अर्धा तास त्यांच्या निवासस्थानी होते. इतकेच नव्हे तर मनालीतील सिमला स्थित कंगनाच्या घरी त्यांनी नाश्तादेखील केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नाश्त्यामध्ये कंगनाच्या आईने बबरू आणि भल्ले पदार्थ केले होते. जे जयराम ठाकूर यांनी आवडीने खाल्ले असल्याचे सांगितले जात आहे. ठाकून त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर हेही उपस्थित होते. या भेटीनंतर कंगनाने मुख्यमंत्री ठाकूर यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा साधेपणा आणि प्रेम भावना दोन्हीही प्रेरणादायक आहे. शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर हे माझे शेजारी आहेत. मात्र, अनेक वर्षांनंतर आज त्यांना भेटण्याचाही योग आला. अशी भावनाही तिने यावेळी व्यक्त केली. तसेच त्यांच्या भेटीचे काही फोटोदेखील कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यासोबत, कंगना यांच्या निमंत्रणावरूनच त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी यापूर्वीही अनेकदा घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. असे मुख्यमंत्री ठाकून म्हणाले आहेत. जयराम ठाकूर हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षातले आहेत. मंडी जिल्ह्यातील सिराज विधानसभा मतदारसंघातून ते हिमाचल प्रदेशच्या विधानसभेवर निवडून आले आहेत. १९९८ पासून ते हिमाचल प्रदेश विधानसभेत आमदार आहेत. तिच्या या भेटीमुळे ती राजरकारणात येणार अशी चर्चा आहे मात्र तिने अद्याप कोणती घोषणा केली नाही.
कंगनाने नुकतीच मथुरेतील बाके बिहारी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले होते. धाकड या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. कंगनाने याआधी ‘थलायवी’, ‘सिमरन’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न्ससारखे’ हिट चित्रपट दिले आहेत.