Friday, April 25, 2025
Homeक्रीडादुखापतीमुळे दीपक चहर स्पर्धेबाहेर

दुखापतीमुळे दीपक चहर स्पर्धेबाहेर

सिडनी (वृत्तसंस्था) : विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला लागलेले दुखापतीचे ग्रहण काही सुटण्याचे नाव घेत नाही. रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांच्या पाठोपाठ दीपक चहरही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. दीपक चहरच्या पायाचा घोटा दुखावला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही.

बुमराहचा बॅकअप प्लॅन देखील फेल झाला असे दिसत आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडला. त्यानंतर दीपक चहर बॅकअप प्लॅनसाठी तयार करत होता. पण त्यांच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी समोर आली आहे कारण तो चहर या स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

जसप्रीत बुमराहच्या जागी चहरला किंवा मोहम्मद शमीला मुख्य संघात घेण्याची चर्चा होती. आता चहर दुखापतीमुळे या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे. लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा चेतन साकारिया नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियातील टीम इंडियामध्ये सामील झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -