मुंबई : आठवड्याच्या पहिली दिवशी शेअर बाजार गडगडला त्यानंतर आजही शेअर बाजार अस्थिर आहे. सकाळी व्यवहाराची सुरुवात सावध झाली. पहिल्या सत्रात शेअर बाजारात सुरुवातीला किंचित तेजी दिसून आली. त्यानंतर बाजारात घसरण सुरू झाली. आज बाजाराची सुरुवात जवळपास सपाट झाली.
जागतिक बाजारातून कोणतेही सकारात्मक संकेत नसल्यामुळे आणि सेंट्रल बँकांच्या व्याजदरात आणखी वाढ करण्याच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास कचरत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. येत्या काळातही बाजार सावध राहील आणि बुधवारच्या एफओएमसीवर सर्वांचे लक्ष असेल.
निफ्टीला १७०५० च्या जवळ सपोर्ट आहे आणि इथून त्याने चांगली वाढ केली आहे. निफ्टीने डेली चार्टवर बुलिश कँडल तयार केली आहे. त्याच बरोबर, त्याने रिव्हर्सल फॉर्मेशन तयार केले आहे. निफ्टी १७१५० च्या वर राहण्यात यशस्वी झाला तर आपण पुन्हा एकदा १७४००-१७४५० ची पातळी पाहू शकतो. दुसरीकडे, जर निफ्टी १७१५० च्या खाली घसरला तर ही घसरण १७०५०-१७००० पर्यंत जाऊ शकते.