Thursday, July 10, 2025

जम्मू काश्मीरमध्ये 'एनआयए'चे छापे

जम्मू काश्मीरमध्ये 'एनआयए'चे छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. टेरर फंडिंग केसच्या संदर्भात एनआयएने छापे टाकले आहेत. काश्मिरातील राजौरी, पूँछ, जम्मू, श्रीनगर, पुलवामा, बडगाम, शोपियान, बंदिपोरा या ठिकाणी तपास संस्थेने छापे टाकले आहेत.


दरम्यान, जम्मू काश्मीरातील बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेल्या जमात-ए-इस्लामी या संघनटेसाठी काम करत असलेल्या अल हुदा एज्युकेशनल ट्रस्टच्या फंडिंग पॅटर्नमुळे राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने पीएफआय या संस्थेच्या देशभरातील कार्यालयावर छापे टाकले होते. त्यामध्ये १०० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या संस्थेवर पाच वर्षाची बंदी घातली असून ट्वीटर अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर अनेक मुस्लीम कार्यकर्त्यांनी देशभरात सरकारविरोधात निदर्शने केले होते.


दरम्यान, या संस्थेवर कारवाई केल्याचे पडसाद पाकिस्तानातही पडले असून हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याचा त्यांचा डाव होता. त्यानंतर या संस्थेचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. तर याचप्रकरणी एनआयए ने जम्मू काश्मिरातही छापे टाकले आहेत.

Comments
Add Comment