बेस्ट वर्कर्स युनियनचे वडाळा आगारात आंदोलन

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट उपक्रम अनेकदा कामगारांच्या बाबतीत उदासीन असल्याचे पाहायला मिळते, त्यातच आता तिकीट मशीन नादुरुस्त झाल्यास त्यासाठी वाहकाला जबाबदार धरून दंड वसूल करण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून याबाबतचा फतवा काढण्यात आला आहे. याचा विरोध करत कामगारांनी बेस्ट वर्कर्स युनियनच्या मार्गदर्शनाखाली वडाळा आगारात आंदोलन केले.


मुंबईकरांना कमी दरात बेस्ट चांगली सेवा देते. मात्र दुसरीकडे कामगारांच्या बाबतीत भेदभाव करत असल्याचा आरोप नेहमी बेस्टवर केला जातो. बेस्टकडून तिकीट मशीन नादुरुस्त झाल्यास त्यासाठी वाहकाला जबाबदार धरून त्याच्याकडून याचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे परिपत्रक बेस्टकडून जाहीर करण्यात आले.


यात मशीन मागील कव्हरसाठी १५८२ रुपये, बॅटरी कव्हरसाठी ११०५ रुपये, बॅटरीसाठी २२१४ रुपये, थर्मल प्रिंटरकरिता १८०३ रुपये, एलइडी कव्हरसाठी ४७३७ रुपये, मेन बोर्डसाठी ८४३८ रुपये, वायफाय अँटीना ब्रॅकेटसाठी ९६० रुपये, तर पेपर फ्लॅपकरिता ९६० रुपये अशी किंमत वसूल करण्यात येणार असल्याचे पत्रक बेस्ट प्रशासनाने काढले. त्यावर कर्मचाऱ्यांना होणाऱ्या या भूर्दंडाविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनकडून आंदोलन करण्यात आले.


दरम्यान या निर्णयाविरोधात मंगळवारी केवळ निदर्शने करून आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या बैठकीत बेस्ट प्रशासनाकडे आम्ही हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली असून युनियनकडून दिवाळीपर्यंत वाट पाहण्यात येईल, अन्यथा दिवाळीनंतर आंदोलन करण्यात येईल. - शशांक राव, बेस्ट वर्कर्स युनियन अध्यक्ष
Comments
Add Comment

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

राज्यात नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक