नाशिक : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही चालू आहे. त्यातून येणाऱ्या दिवसांमध्ये राजकारणात प्रवेश करायचा का नाही याचा मुहूर्त निश्चित केला जाईल आणि त्या पद्धतीप्रमाणे राजकारणात प्रवेश केला जाऊ शकतो, असे स्पष्ट संकेत सिनेअभिनेता आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख यांनी दिला आहे.
नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव सिने अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रितेश देशमुख यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सध्याचे राजकारण चालू आहे ते बघितल्यानंतर राजकारणात यावे की न यावे हा विचार करण्यासारखा आहे; परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये काही दिवस थांबून राजकारणामध्ये येण्यासाठी विचार केला जाऊ शकतो, याचे स्पष्ट संकेत देत रितेश देशमुख पुढे म्हणाले की, माझ्या घरामध्ये दोन राजकारणी भाऊ आहेत.