मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. वेळे अभावी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम अजून वाढला आहे.
संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. त्यामध्ये त्यांना १० ऑक्टोबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज वेळेअभावी त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकलेली नाही. पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.