Sunday, January 19, 2025
Homeदेशमहाकाल कॉरिडॉरचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

महाकाल कॉरिडॉरचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

सुंदर वास्तूकला व नक्षीकाम असलेले १०८ स्तंभ, कॉरिडॉरमुळे मिळणार राज्यातील पर्यटनालाही चालना

उजैन (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशच्या उजैनमध्ये भव्य महाकाल कॉरिडॉर तयार झाला आहे. महाकाल कॉरिडॉरला महाकाल लोक असेही म्हणतात. पंतप्रधानांच्या हस्ते या भव्य कॉरिडॉरचे उदघाटन करण्यात येणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल लोक भव्य मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे. महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास योजनेच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. या प्रकल्पासाठी ८५६ कोटींचा खर्च आला आहे. महाकाल लोक वास्तूकला आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी कॉरिडॉर लोकर्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला.

महाकाल कॉरिडॉरमध्ये दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. याशिवाय सुंदर वास्तूकला आणि नक्षीकाम असलेले १०८ स्तंभ आहेत. शिवपुराणातील माहिती सांगणारे देखावे आणि मुर्ती, ५० हून अधिक भित्तीचित्रे आणि कारंजे अशा या कॉरिडॉरची वैशिष्ट्य आहेत. महाकाल लोक ९०० मीटरहून अधिक लांब कॉरिडॉर आहे. हे भारतातील सर्वात मोठं कॉरिडॉर आहे. महाकाल कॉरिडॉरमध्ये दोन प्रवेशद्वार आहेत. यातील एक म्हणजे नंदी द्वार आणि दुसरे पिनाकी द्वार. हा महाकाल कॉरिडॉर भाविकांना नंदी द्वारपासून महाकालेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो.

उज्जैनमधील प्राचीन महाकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्याच्या उद्देशाने हे महाकाल लोक उभारण्यात आले आहे. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देश-विदेशातील अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. या कॉरिडॉरसाठी ८५६ कोटी निधी लागला आहे. या कॉरिडॉरमुळे मध्यप्रदेशातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. उद्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ३५० कोटी खर्च आला आहे.

महाकाल कॉरिडोरचे बांधकाम २०१९ मध्ये सुरू झाले होते. हा संपूर्ण मंदिर परिसर दोन हेक्टरमध्ये असून त्यासाठी सुमारे ८०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बांधकामाच्या एकूण खर्चापैकी ४२२ कोटी रुपये राज्य सरकार, तर २१ कोटी रुपये मंदिर समिती आणि उर्वरित रक्कम केंद्र सरकार खर्च करणार आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होईल. त्यासाठीची जय्यत तयारी सध्या सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -