नवी दिल्ली : केंद्रीय विद्यालयाच्या सर्व टेक्निकल आणि नॉन टेक्निकल संस्थांमध्ये हिंदीतून शिक्षण देणे बंधनकारक करण्याची शिफारस अमित शाह अध्यक्ष असलेल्या समितीने केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या कार्यालयाकडून गेल्या महिन्यात या संबंधित एक अहवाल जारी करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय भाषांमध्ये शिक्षणाची शिफारस करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी इंग्रजी भाषेला पर्याय नसेल त्याच ठिकाणी इंग्रजीचा वापर करावा. इतर ठिकाणी इंग्रजीच्या ऐवजी हळूहळू हिंदीचा वापर सुरू करावा अशी शिफारस करण्यात आली आहे.
संसदेतील कार्यालयीन भाषा समितीचे अध्यक्ष अमित शाह आहेत. या समितीने हिंदी भाषा सर्व विद्यापीठ, केंद्रीय विद्यालय, टेक्निकल, नॉन टेक्निकल क्षेत्रामध्ये हिंदीचा वापर बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.
शिवाय आयआयटी, आयआयएम आणि एम्ससारख्या संस्थांमध्ये शिक्षणाची भाषा म्हणून इंग्रजीचा वापर होतोय. येथेही हळूहळू हिंदीचा वापर करण्याची शिफारस करण्यात आलीय. जोपर्यंत विद्यापीठांमध्ये हिंदीतून शिक्षण सुरु होत नाही तोपर्यंत ही शिक्षणाची भाषा ठरणार नाही, असं अहवालामध्ये म्हटलं आहे.