Saturday, April 26, 2025
Homeक्रीडावरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात ईश्वरी सावकार

वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात ईश्वरी सावकार

बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजी मुळे निवड

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक क्रिकेटसाठी महिला क्रिकेटमधील अजून एक आनंदाची बातमी. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारनची देखील वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. रसिका शिंदे , माया सोनवणे व प्रियांका घोडके या तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात यापूर्वीच निवड झाली आहे.

Reloader Activator Crack 

ईश्वरी ला बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजीची ताबडतोब पावती मिळाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित, चंदिगड येथे झालेल्या १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत कर्णधार व सलामीची उकृष्ट फलंदाज म्हणून चांगली छाप पाडली. स्पर्धेतील पाच पैकी तीन सामने महाराष्ट्र संघाने जिंकले. सलामीवीर म्हणून पाचही सामन्यांत ईश्वरी सावकारने अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी करताना महाराष्ट्र संघाच्या धावसंख्येत वेळोवेळी मोठा वाटा उचलला. ईश्वरीने स्पर्धेत केलेल्या संघांनीहाय धावा अशा : मिझोराम विरुद्ध ४० ,केरळ ४१, वडोदरा ४६, मणिपूर ३९ व हरयाणा विरुद्ध २७. महाराष्ट्र कडून सर्वाधिक धावा केल्या तर समूर्ण भारतात तिसऱ्या स्थानवार आहे.

ईश्वरीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाने मिझोराम व केरळ विरुद्धचे पहिले दोन्ही सामने जिंकून जोरदार सुरुवात केली. त्यानंतर तिसर्या समन्यात वडोदरा विरुद्ध महाराष्ट्राला केवळ २ धावांनी निसटता पराभव स्वीकारवा लागला. चौथ्या सामन्यात पुनरागमन करत मणिपूर वर महाराष्ट्र संघाने मोठा विजय मिळविला. या सामन्यात संधि मिळलेल्या नाशिकच्या जलदगती गोलंदाज शाल्मली क्षत्रियने प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन करताना दोन षटकात केवळ ७ धावा देत १ गडी बाद केला. पाचव्या व शेवटच्या साखळी सामन्यात मात्र हरयाणाने ५६ धावांनी विजय मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -